शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाण्यावर ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 23:21 IST

कºहाड : कºहाड शहरातून कृष्णा नदीत पडत असलेल्या सांडपाण्यामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे हे सांडपाण्याचे प्रवाह तत्काळ बंद करण्यात यावेत व त्याचा पंधरा दिवसांत अ‍ॅक्शन प्लॅन सादर करावा, याबाबतची नोटीस प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून नुकतीच पालिकेस पाठविण्यात आली आहे. तर पुणे येथे पाणी तपासणीसाठी पाठविलेले नमुने दोनच दिवसांत मिळणार ...

कºहाड : कºहाड शहरातून कृष्णा नदीत पडत असलेल्या सांडपाण्यामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे हे सांडपाण्याचे प्रवाह तत्काळ बंद करण्यात यावेत व त्याचा पंधरा दिवसांत अ‍ॅक्शन प्लॅन सादर करावा, याबाबतची नोटीस प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून नुकतीच पालिकेस पाठविण्यात आली आहे. तर पुणे येथे पाणी तपासणीसाठी पाठविलेले नमुने दोनच दिवसांत मिळणार आहेत.कºहाड येथील कृष्णा नदीची व नदीकाठच्या चार ठिकाणी असलेल्या सांडपाणी नाल्यांची गत आठवड्यात प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे साताºयाचे उपप्रादेशिक अधिकारी बाबासाहेब कुकडे यांनी भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी त्यांना शहरातील नाल्यांतून दूषित पाणी नदीत मिसळत असल्याचे दिसून आले होते. त्यावेळी त्यांनी तत्काळ याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना पालिका अधिकाºयांना केल्या होत्या. तसेच दूषित पाणी प्रश्नी लवकरच नोटीस देण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार पालिकेस प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून खबरदारीचे नोटीस देण्यात आले आहे. शहरातून नदीत पडणारे सांडपाण्याचे प्रवाह तत्काळ बंद करावे व त्याचा अ‍ॅक्शन प्लॅन पंधरा दिवसांत सादर करावा, अशा सूचना प्रदूषण नियंत्रणकडून देण्यात आलेल्या नोटिसीत आहेत.प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून वारंवार सूचना करूनही पालिकेकडून त्याकडे लक्ष दिले जात नसल्याचा प्रकार यापूर्वीही अनेकदा कºहाडकरांनी अनुभवला आहे. अशात शनिवारी बुधवार पेठेतील पंचशीला चौकात डेंग्यूच्या अळ्या आढळल्याने पालिकेच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कºहाडकरांना यापूर्वी पिण्याच्या पाण्याच्या बदलेल्या चवीमुळे त्रास सहन करावा लागला. आता तर चक्क नळाच्या पिण्याच्या पाण्यातूनच डेंग्यूच्या अळ्या आल्या. अगोदरच नदी प्रदूषणचे प्रकरण निवळत नाही, तोपर्यंत आता पिण्याच्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या आढळल्याने याबाबत प्रदूषण नियंत्रण महामंडळ तसेच जिल्हा आरोग्य विभागाकडून पालिकेवर कारवाई करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अ‍ॅक्शन प्लॅन सादर करण्याच्या सूचनाकºहाड पालिकेने पंधरा दिवसांच्या आतमध्ये शहरातील गटारावाटे नदीत मिसळणाºया सांडपाण्याचे प्रवास बंद करून त्याचा अ‍ॅक्शन प्लॅन प्रदूषण नियंत्रण महामंडळास सादर करणे गरजेचे आहे. या प्लॅननुसार यामध्ये प्रत्येक दिवसाची नोंद करून त्या-त्या दिवशी पालिकेने कोणती कामे केली, याबाबत माहिती द्यावयाची आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण